कन्या महाविद्यालयाची अभ्यास भेट

कन्या महाविद्यालयाची अभ्यास भेट
Published on

ich32.jpg
68819
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागामार्फत खिद्रापूर ग्रामपंचायतीस अभ्यास भेट दिली.
कन्या महाविद्यालयाची अभ्यास भेट
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागामार्फत खिद्रापूर ग्रामपंचायतीस अभ्यास भेट दिली. सरपंच सारिका कदम यांनी उपस्थित विद्यार्थिनींना ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्राची माहिती दिली. कुलदीप कदम, पंचाक्षरी कोष्टी, राजेंद्र सुंके, आदी सदस्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ग्रामपंचायत प्रशासनविषयक माहिती दिली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोपेश्वर मंदिराची माहिती विद्यार्थिनींनी घेतली. अभ्यास भेट प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. वर्षा पोतदार यांनी आयोजित केली होती.
-----
ich33.jpg
68820
इचलकरंजी : कब बुलबुल तालुका मेळाव्यात मालती माने विद्यालय अव्वल ठरले.
माने विद्यालयाचे कब बुलबुल अव्वल
इचलकरंजी : बनी कब बुलबुल स्काऊट गाईड तालुका मेळाव्यात सर्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत मालती माने विद्यालयाचे कब बुलबुल पथक अव्वल ठरले. या पथकाने कोपरा सजावट, मोगलीची गोष्ट, बेस्ट कब पॅक या तिन्‍ही स्पर्धेंत प्रथम आणि बुलबुलच्या पथकाने घरटे सजावट, ताराची गोष्ट, बेस्ट बुलबुल पॅक या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत अजिंक्यपद राखले. मेळाव्यात शाळेतील ११५ जणांचा सहभाग होता. बालवाडीच्या बनींच्या सहभागाचे विशेष कौतुक केले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने, सचिव शिवाजी जगताप, सहसचिव पृथ्वीराज माने, प्रशासक विमल काटकर यांच्या हस्ते सत्कार केला.
-----
ich34.jpg
68821
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयातील तुषार शेटके याने कंपनी सेक्रेटरी इंटर परीक्षेत यश मिळविले.
तुषार शेटकेचे यश
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयातील तुषार शेटके याने कंपनी सेक्रेटरी इंटर परीक्षेत यश मिळविले. बी.कॉम. भाग-३ मधील शेटके याने पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. शहरातील एकमेव विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. त्याचा प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या हस्ते सत्कार केला. त्याला विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
---
ich35.jpg
68822
इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ हेरिटेजमार्फत आदर्श विद्यामंदिरात प्रोजेक्टर प्रदान कार्यक्रम झाला.
‘रोटरी’तर्फे प्रोजेक्टर प्रदान
इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ हेरिटेजमार्फत आदर्श विद्या मंदिर व रामभाऊ जगताप हायस्‍कूलमध्ये प्रोजेक्टर प्रदान सोहळा झाला. प्रांतपाल नासिर बोरसादवाला, सहायक प्रांतपाल रवीकुमार आडुकिया, हरीष मर्दा, पारितोष गांधी, विनीत बलदवा, डी. एम. विरादार, रमेश मर्दा यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत मुख्याध्यापिका गीता खोचरे यांनी केले. शाळेची स्केटिंगपट्टू संध्या कडेकर हिचा सत्कार करण्यात आला. रामभाऊ जगताप हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक शिंदे, श्रेया कुलकर्णी, प्रणव सोनटक्के यांसह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नागेश चिल्लाळ, तर आभार श्रेया कुलकर्णी यांनी मानले.
----
ich36.jpg
68823
इचलकरंजी : बिशप स्कूल अॅन्‍ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी अंतरंग कार्यक्रमात कैश बागवान यांनी मार्गदर्शन केले.
बिशप स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
इचलकरंजी : बिशप स्कूल अॅन्‍ड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्नेहसंमेलन अंतरंग कार्यक्रम श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून बादशहा ग्रुपचे संस्थापक बादशाह बागवान, प्रिया लक्ष्मी मिल्सचे अरुणकुमार बाहेती, नाहटा ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक सुरेश नाहटा, तर गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील, अध्यक्ष कैश बागवान, सलीम ढलाईत, सलीम अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. कैश बागवान यांनी संस्थेची प्रगती मांडली. बाल कलाकारांनी विविध नाट्य, नृत्य, कथाकथन, शालेय गीत, देशभक्ती गीत, संस्कारमय नाटिका, सोशल मीडिया दुष्परिणाम नाटिका रुपात सादर केले. संस्थेचे उपाध्यक्ष इम्तियाज म्हैशाळे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका वैशाली कोळी, माध्यमिक मुख्याध्यापक अयुब आवटी, पर्यवेक्षक हुसेन गद्याल, आदींनी परिश्रम घेतले.
--
ich37.jpg
68824
इचलकरंजी : वेस्टर्न महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षीय बॅचचा १०० टक्के निकाल लागला.
नर्सिंग कॉलेजचा निकाल १०० टक्के
इचलकरंजी : येथील वेस्टर्न महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजच्या प्रथम वर्षीय बॅचचा १०० टक्के निकाल लागला. वेस्टर्न महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज हे सुरुवातीपासूनच यशाची परंपरा जोपासत आले आहे. विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यांना कॉलेजच्या प्रिन्सिपल कोमल भिसे, श्री. बुद्धे, गुणाजी नागरत्न यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com