धान्यबाजारात तुरडाळीचा तुटवडा

धान्यबाजारात तुरडाळीचा तुटवडा

08450
इचलकरंजी : १) हंगामी भोकर अर्थात गुंद्याला लोणच्यासाठी मागणी आहे.
08449
२) बेबी हापूस दाखल झाला असून, ग्राहकांची पसंती मिळत आहे.
---------------------
धान्यबाजारात तूरडाळीचा तुटवडा
तांदळाची नवीन आवक सुरू ः खाद्यतेल बाजारात तेजी-मंदीची स्थिती
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : धान्यबाजारात तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. प्रतिकिलो दरात ८ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत तुटवडा आणखी भासू शकतो, अशी भीती व्यापाऱ्यांना आहे. तांदळाची नवीन आवक सुरू झाली आहे. नवीन आवक वाढून दर कमी येतील, असे चित्र धान्यबाजारात आहे. ज्वारीची आवक कायम आहे. खाद्यतेल बाजारात तेजी, मंदीची स्थिती पाहायला मिळत आहे.
भाजीपाला बाजारात पालेभाज्यांचे भाव आणखी कमी झाले आहेत. या आठवड्यात आवक सुधारली आहे. कांदापात, मेथीचे भाव अन्य भाज्यांच्या बरोबरीत आले आहेत. शेवग्याची आवक चांगली आहे. दहा रुपयाला चार ते पाच शेंगा विक्रीस आहेत. देशी काकडीची आवक जोमात होत आहे. हंगामी भोकर अर्थात उत्तर भारतीय, मारवाडी लोकांच्या आवडत्या गुंद्याला मागणी चांगली आहे. उन्हाळ्यात लोणच्यासाठी याची विक्री बाजारात होत असते. फळबाजारात हंगामी फळांची चलती असून, आंबे लक्ष वेधून घेत आहेत. बेबी हापूस दाखल झाला असून, याची किलोवर विक्री केली जाते. कलिंगड, टरबूजची मागणी अधिक आहे. फूल बाजारात झेंडू, शेवंतीच्या फुलांचे दर काहीसे वाढले आहेत.
----
प्रतिकिलो रुपये भाजीपाला
टोमॅटो - १० ते १५, दोडका- ५० ते ६०, वांगी -३० ते ५०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण- १२० ते १५०, आले- १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ६०० शेकडा, गाजर - ३० ते ४०, बीन्स- ७० ते ८०, गवार -८० ते १००, वरणा शेंगा - ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी- ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा -७० ते ८०, पालेभाज्या पेंढी -१२ ते १५, शेवगा - ३ रुपये.
- - --- - - -
फुले : झेंडू - १०० ते १२०, निशिगंध -३००, गुलाब - १८० ते २००, गलांडा - १२० ते १५०, शेवंती -२००.
- - -- - -
फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- ५० ते ८०, डाळिंब- १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई - ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.
-- -
खाद्यतेल : सरकी - ११५ ते १२०, शेंगतेल - १७६ ते १८२, सोयाबीन - ११६ ते १२०, पामतेल - ११० ते ११६, सूर्यफूल - १२० ते १२५.
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभरडाळ - ७३ ते ७६, तूरडाळ- १४५ ते १५५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ- १२२ ते १३०, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोले -१४० ते १६०.
----
लिंबूची आवक; दर घसरले
उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाल्यानंतर लिंबूचे दर भडकले होते. आता उन्हाच्या झळा तीव्र होत असताना लिंबूने दिलासा मिळाला आहे. शेकडा ८०० च्या घरात गेलेले दर आवाक्यात आले आहेत. बाजारात आवक जास्त असल्याने दर कमी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com