अपघात मयत

अपघात मयत

अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
इचलकरंजी, ता. ४ : यड्राव-जांभळी रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. आकाश कृष्णात भोंगे (वय २८ रा. शहापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबतची वर्दी एक्झॉन हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आकाश भोंगे हा जांभळी येथे आपल्या मावशीकडे गेला होता. बुधवारी (ता. ३) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तो शहापूरकडे परत येत होता. दरम्यान, यड्राव-जांभळी रस्त्यावर त्याची दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात आकाश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आकाशचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com