खाद्यतेलाच्या दरात पुन्हा घसरण

खाद्यतेलाच्या दरात पुन्हा घसरण

08566
इचलकरंजी : १) भाजीपाला बाजारात बिन्सचा तुटवडा असून, आवक कमी आहे.
08565,
२) फळबाजारात मोसंबीची आवक सुरू झाली आहे.
-------------------
खाद्यतेलाच्या दरात पुन्हा घसरण
झेंडू, निशिगंध, गुलाबाचे दर वाढले ः सफरचंद, डाळिंबाचा तुटवडा
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २६ : खाद्यतेलाचा चढता आलेख आता पुन्हा कमी होत आहे. या आठवड्यात तेलाचे दर २ ते ३ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. पुरवठा जास्त होत असला, तरी मागणी कमी असल्याने दरावर परिणाम होत आहे. असाच काहीसा परिणाम धान्यबाजारातही दिसून येत असून, धान्याचे दर टिकून आहेत. फूल बाजारात मागणी, उत्पादन, दराचा मेळ बसत नाही. झेंडू, निशिगंध, गुलाबाला भाव वाढला असून, दरात कमालीची वाढ झाली आहे.
भाजीपाला बाजार उन्हाच्या झळांमुळे कासावीस होत आहे. आवक आणि मागणीनुसार भाजीपाल्याला दर मिळत आहे. पावसामुळे बाजार समितीत आवक कमी होत आहे. मेथी, कोथिंबीरचे भाव २० रुपयांपर्यंत होते. बिन्सचा तुटवडा असून, किलोला ४० ते ५० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. लग्नसमारंभामुळे बिन्सला मागणी अधिक आहे. फळबाजारात कलिंगडाची आवक कमी झाली आहे. तसेच सफरचंद, डाळिंबाचा तुटवडा आहे. मोसंबीची नव्याने आवक सुरू झाली आहे. कच्च्या तोतापुरी कैरीची आवक वाढली आहे.

प्रति किलो रुपये भाजीपाला ः टोमॅटो- १० ते १५, दोडका- ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण- १८० ते २००, आले- १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ६०० शेकडा, गाजर - ३० ते ४०, बिन्स- १६० ते १८०, गवार -८० ते १००, वरणा शेंग - ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी- ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा -७० ते ८०, पालेभाज्या - १२ ते १५, कोथिंबीर, मेथी (पेंढी) - २० ते २२, शेवगा - २ ते ३ रुपये नग.
- - --- - - -
फुले : झेंडू - १२० ते १५०, निशिगंध - ३०० ते ३५०, गुलाब - २८० ते ३००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती १८० ते २००.
- - -- - -
फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- ६० ते ८०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोरआवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.
-- -
खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२ .
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७८ ते ८३, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोला -१४० ते १६०.
--------
टोमॅटोची लाली उतरलेलीच
उन्हाळा सुरू झाला की टोमॅटोला चांगलाच दर येतो. आवकही कमी होते आणि मागणीही वाढते. मात्र यंदा चित्र उलटे आहे. दीड महिन्यापासून टोमॅटोचा दर जैसे थे आहे. उन्हामुळे माल खराब होत असला, तरी दर पडलेलेच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com