गुंडांना ना राहिले पोलिसांचे भय

गुंडांना ना राहिले पोलिसांचे भय

08676
संग्रहित
--------
गुंडांना ना राहिले पोलिसांचे भय
इचलकरंजीत चार महिन्यांत अकरा सशस्त्र हल्ले : गुन्हेगारीत नवखे चेहरे
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १४ : जर्मनी गँगवर सातव्यांदा मोका कारवाईच्या प्रस्तावाची मंजुरीची चर्चा शहरात सुरू असताना पुढील आठ तासांत तरुणाचा खून केला. तर पुढील दहा तासांच्या आत दिवाणजीवर तलवारीने खुनी हल्ला केला. चार महिन्यांपसून अशा रक्तरंजित घटनांचे सत्र सलग सुरू असून, पोलिसांचे भय आता उरले नसल्याचे दिसत आहेत.
जामिनावर बाहेर येणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे चित्र आधीच गंभीर असताना आता वस्त्रनगरीच्या गुन्हेगारीत नवखे चेहरे पुढे येत आहेत. चार महिन्यांत अकरा जणांवर सशस्त्र जीवघेणे हल्ले झाले असून त्यातील पाच जणांना जीव गमवावा लागला आहे.
इचलकरंजी शहरात गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे, तसे गुन्ह्यांची कारणेही बदलत चालली आहेत. शहरातील १७ टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केल्यामुळे संघटित गुन्हेगारीचा विळखा कमी होत आहे. मात्र, काही मोजक्या टोळ्या आजही गुन्हेगारीशी खेळून राहत कारागृहात असणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार जामिनावर बाहेर येत शहरात वावरत आहेत. अशांची संख्या भरमसाठ झाल्याने गुन्हेगारीला बळ मिळत आहेत. तर अशातच दुसरीकडे शहरात वाढत्या गुन्हेगारीत नव्या समस्या पोलिसांसमोर आव्हान निर्माण करत आहेत. टपरीवरची चेष्टा, शाब्दिक वाद, आर्थिक देवाण-घेवाण, प्रेमप्रकरण असा तत्कालीन व जुने वैमनस्य उफाळून येत गुन्हेगारीचा विळखा घट्ट होत आहे.
खून अथवा खुनी हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर घटनास्थळी जाणे, पंचनामा तसेच संशयित आरोपींना अटक करणे यापलीकडे पोलिस यंत्रणा प्रभावीपणे काम करताना दिसत नाहीत. काही घटनांमध्ये तर अनेक संशयित स्वतःच पोलिस ठाण्यात हजर होत आहेत. चार महिन्यांत खून व खुनी हल्ल्याच्या ११ घटना पोलिसांना जागे करणाऱ्या आहेत. खुनाच्या घटना शहराबाहेरील निर्जन मोकळ्या मैदानात रात्री होत आहेत. खुनी हल्ल्याच्या घटना दिवसा भरवस्तीत होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत वाढती गंभीर गुन्हेगारी पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही तर किरकोळ कारणांसाठी गुन्हेगारीचे स्वरूप व व्यापकता भयाण होऊन बसणार आहे.
---
कारवाईची गंभीरता खुनानंतर
खून, खुनी हल्ल्याचे सलग सत्र तसेच एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच पोलिसांना कारवाईची गंभीरता समजत आहे. त्यानंतर झोपेतून खडबडून जागे झाल्यासारखे पोलिस कारवाईला सुसाट पळतात. याचा प्रत्यय सोमवारी (ता. १३) रात्री ओपन बारच्या कारवाईवेळी आला. मात्र, इतरवेळी पोलिस यंत्रणा सुस्तच असते.
----
अधिकाऱ्यांची सक्षमता आहे कुठे ?
शहरात यापूर्वी तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षकांनी वाढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना अटकाव करत शांतता प्रस्थापित केली होती. मात्र, त्यानंतर अधिकारी बदललेले तसे गुन्हेगारांवरील पकड सैल झाली आहे. सध्या पोलिस ठाण्यातही प्रभारी अधिकारी स्थिर नाहीत.
आणि वरिष्ठ अधिकारी हे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांची सक्षमता हरवल्यासारखी स्थिती आहे.
----
गुन्हेगारी घटना (चार्ट आहे.)
(जानेवारी ते १४ मेपर्यंत)
पोलिस ठाणे *खून* खुनी हल्ले
शिवाजीनगर *१*३
गावभाग * २* १
शहापूर* २* २

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com