हातकणंगलेच्या निकालात दोन टक्यांनी वाढ

हातकणंगलेच्या निकालात दोन टक्यांनी वाढ
Published on

08728
इचलकरंजी : निकाल पाहण्यासाठी हुरहूर झालेले विद्यार्थी सायबर कॅफेत निकाल पाहताच प्रफुल्लित झाले.

हातकणंगलेच्या निकालात दोन टक्क्यांनी वाढ
बारावी परीक्षा ः तालुक्याचा निकाल ९५.६६ टक्के, आयटीआय कॉलेजची मुसंडी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २१ : घटलेला टक्का भरून काढण्याचा प्रयत्न करत यंदा हातकणंगले तालुक्याचा बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल ९५.६६ टक्के लागला. तालुक्याचा निकाल दोन टक्क्यांनी वाढला असला तरी मागील वर्षीची तूट भरून काढता आली नसल्याचे दिसून आले. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची निकालाची परंपरा खंडित झाली असून एकूण १८ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. याचा सर्वाधिक फटका इचलकरंजी शहराला बसला आहे. मात्र, यामध्ये आयटीआय कॉलेजनी चांगली मुसंडी मारली आहे.
यंदा बारावी परीक्षा वेळेत झाली आणि ऑनलाईन निकालही वेळेआधी लागला. शिक्षण मंडळाने एकदिवस आधी तारीख जाहीर करून आज लागणाऱ्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली होती. दुपारी एक वाजताच परीक्षा बोर्ड नंबरसह आईचे नाव समोर घेऊन निकाल पाहण्यात विद्यार्थी गुंतले. कोणी मोबाईल, कोणी कॉम्प्युटर तर कोणी कॉलेजात, अडथळा येऊ नये म्हणून सायबर कॅफेत निकाल पाहण्यासाठी जमले. सुरुवातीला अर्धा तासभर राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर काहीसा व्यत्यय आला. विद्यार्थ्यांनी नित्यप्रयत्न करत अखेर निकाल पहिला. निकाल पाहताच गंभीर झालेले काहीसे प्रफुल्लित चेहऱ्याने एकमेकांचे गुण विचारात आनंद साजरा केला. काहींच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसली. मात्र, निकालानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.
यंदाही सर्व शाखेत विज्ञान भारी ठरले आहे. या शाखेच्या निकालात प्रत्येक कॉलेज १०० टक्के निकालापर्यंत पोहोचले आहे. मात्र, विद्यार्थ्यांची गुणवत्ता फारच घसरली आहे. त्यामुळे निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उदासीनता पाहायला मिळाली. इचलकरंजी शहरासह तालुक्यातील अनेक नावाजलेल्या कॉलेजना शंभर टक्के निकाल टिकवता आला नाही. यामध्ये कला शाखेला मोठा फटका सहन करावा लागला. मोजकी कॉलेज वगळता बहुतांश कॉलेजात कला शाखेला १०० टक्के निकालापर्यंत मजल मारताच आली नाही.
- - - - -
हातकणंगले तालुका निकाल
● एकूण कनिष्ठ महाविद्यालये ..........६०
● नोंदणी केलेले विद्यार्थी........१० हजार ६६४
● परीक्षेला बसलेले विद्यार्थी........१० हजार ६१२
● उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.......१० हजार १५२
● विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण........१ हजार ८७३
● प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.......३ हजार ८७२
● .द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण........ ३ हजार ६१४
● उत्तीर्ण ........७९३
- - - - - - - -
सावित्रीच्या लेकीच भारी
तालुक्यात यंदाही मुलींच्या निकालाचा टक्का वाढत मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.६८ टक्के आहे. तर मुलांचे प्रमाण ९३.९१ टक्के आहे. दरवर्षी निकालात मुलीच पुढे असतात. निकालाचा टक्का एक टक्क्यांनी वाढला आहे. त्या तुलनेत मुलांचा टक्का काहीसा घटला आहे.
----
न्यू इंग्लिश स्कूल ९७.२९ टक्के
कुंभोज ः येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सचा बारावीचा निकाल ९७.२९ टक्‍के लागला. वाणिज्य शाखेचे अनुक्रमे विद्यार्थी असे, वैष्णव घोदे (७५.६७), निकिता भानुसे (६९.८३), नंदिनी नलवडे (६६.६७). कला शाखेचे अनुक्रमे विद्यार्थी असे, सुमय्या सनदे (६९.३३), करुणा माळी (६६.५०), अजय माळी (६१.५०).
-------------
डांगे महाविद्यालयाचे यश
कबनूर ः हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९९ टक्के लागला. कला वर्गाचा निकाल ९६ टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी मयुरी धनवडे, राधिका रेडेकर, श्रावणी वडेर, वाणिज्यचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी संजना कांबळे, पायल मोरे, अजय कारंडे, विज्ञानचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थिनी बुशरा नदाफ, अनुष्का झलके, आशावरी पाटील. विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, सचिव अॅड. राजेंद्र डांगे, खजिनदार विठ्ठलराव मुसाई यांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com