

मागासवर्गीय विद्यार्थी
वसतीगृहात प्रवेश सुरू
इचलकरंजी : ज्योतिराव फुले मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहात मोफत प्रवेश सुरू झाले आहेत. पंचगंगा साखर कारखान्यासमोर गंगानगर येथे असणाऱ्या या वसतिगृहात पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्गातील तसेच आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
-----
वृक्षारोपण
नियोजन करा
इचलकरंजी : वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यासाठी नियोजन करावे, या मागणीचे निवेदन पर्यावरणदूत राजू नदाफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. यावर्षीचे उन्हाळ्यातील तापमान ४० डिग्रीपर्यंत गेले असून यासाठी भयंकर वृक्षतोड कारणीभूत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी यावर्षीच्या पावसाळयात जिल्हयातील ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका यांना सक्तीने वृक्षलागवड करुन त्यांचे संगोपन करण्यासाठी सक्तीचे आदेश द्यावेत. तसेच ज्या नागरीकांनी स्वतःच्या घरासमोर वृक्ष लावले आहेत. त्यांना घरफाळयामध्ये विशेष सुट देवून वृक्षारोपणाच्या स्पर्धा आयोजित करुन बक्षीसेही जाहीर करावीत, अशी मागणी केली.
----
न्यू हायस्कूलमध्ये
व्यायाम शाळा सुरू
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन केले. अध्यक्ष अरुण खंजिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. ए .कोळी यांनी केले. जिममधील साहित्याची माहिती व प्रात्यक्षिक क्रीडाशिक्षक पी. बी. कोळी यांनी करून दिली. उपाध्यक्ष बी. एस. मुरदंडे, पर्यवेक्षक डी. ए. तराळ, एम. के. परीट आदी उपस्थित होते. आभार प्रा. डी.बी. बिरनाळे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.