साहित्यकृती पुरस्कार जाहीर

साहित्यकृती पुरस्कार जाहीर

आपटे वाचन मंदिराचे साहित्यकृती पुरस्कार जाहीर
२२ जूनला वितरण; ‘कालजयी’ उत्कृष्ट काव्यसंग्रह

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. २९ : मराठी साहित्यात सन्मानाचे मानले जाणाऱ्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराचे साहित्यकृती पुरस्कार २०२३ जाहीर झाले. डॉ. घनश्याम बोरकर यांच्या कालजयी काव्यसंग्रहास इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार व अभय बंग यांच्या ‘जीवनाचे काय करू?’ आणि निवडक या साहित्यकृतीला उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार वितरण २२ जूनला सायंकाळी ५ वाजता ग्रंथालयाच्या बजाज सभागृहात होईल. यावेळी ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे प्रमुख पाहुणे असतील.
ग्रंथालयातर्फे दोन मानाच्या पुरस्कारांसह अन्य पुरस्कारही दिले जातात. सन्मानपत्र व रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार महादेव माने (भिलवडी) यांच्या वसप कथासंग्रहाला, विनायकराव देशपांडे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार पी. विठ्ठल (नांदेड) यांच्या संभ्रमाची गोष्ट कादंबरीला, मराठी भाषेतील उत्कृष्ट अनुवादासाठी महादेव जाधव अनुवादित साहित्य पुरस्कार विंग कमांडर अशोक लिमये यांच्या ‘राखेतून उगवतीकडे’ साहित्यकृतीस जाहीर झाला. सौ. वसुंधरा अर्जुनवाडकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार सुजाता राऊत (ठाणे) यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट, पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बालसाहित्यकृती पुरस्कार बाळकृष्ण बाचल (पुणे) यांच्या मुलांचे संमेलन, युवा पद्मरत्न पुरस्कार नयन पऱ्हाड (अमरावती) यांच्या नकळत साहित्यकृतीस जाहीर झाला.
कै. वसंतराव दातार यांच्या स्मरणात लक्षणीय काव्यसंग्रह पुरस्कार आवरसावरन (बबन सरळकर, अमरावती) तर कै. सुलभा मगदूम यांच्या स्मरणार्थ हंबरवाटा (संतोष आळंदकर, औरंगाबाद) काव्यसंग्रहास जाहीर झाला. लक्षणीय गद्य साहित्यकृतीसाठी निसर्गकल्लोळ (अतुल देऊळगावकर, लातूर) वज्रपुरुष (अरविंद गोखले, पुणे) यांना जाहीर झाला. कै. मुकुंद कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ स्थानिक साहित्यिक पुरस्कार प्रा. अशोक दास यांना तर उत्कृष्ट वाचक पुरस्कार समीर मैंदर्गी यांना जाहीर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com