खेळाडू  हरकती निवेदन

खेळाडू हरकती निवेदन

‘खेळाडू आरक्षण प्रारूपावर
हरकतीसाठी मुदतवाढ द्या’

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. ३ : राज्य शासनाने खेळाडू आरक्षण प्रारूपावर हरकती घेण्यास मुदतवाढ द्यावी, या मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे यांना देण्यात आले. खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणात बदल सुचविणारे प्रारूप शासनाने प्रसिद्ध केले आहे. याला विरोध दर्शवत प्रारूपावर हरकती घेण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्त्वाखाली क्रीडा शिक्षकांनी केली.
खेळाडूंना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षणाचे धोरण शासनाने अवलंबलेले आहे. याअंतर्गत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण मिळत होते. या धोरणात बदल सुचविणारे प्रारूप शासनाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार राज्यस्तरावर प्रावीण्यप्राप्त किंवा सहभागी खेळाडूंना मिळणारे आरक्षणाचे फायदे यापुढे मिळणार नाहीत. याचा फटका राज्यातील असंख्य राज्यस्तरीय खेळाडूंना बसेल. शासनाच्या निर्णयाला क्रीडा क्षेत्रातून व्यापक विरोध होत असताना प्रारूपावर हरकती घेण्याची मुदत ४ जूनला संपणार आहे.
एकीकडे शासन निर्णयाची माहिती क्रीडा क्षेत्रातील अनेक घटकांपर्यंत पोहोचलेली नसताना हरकती घेण्याची मुदत संपत आलेली आहे. यासाठी प्रारूपावर हरकती घेण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षक संघटनेतर्फे केली आहे. मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री यांना आमदार आवाडे यांच्यामार्फत पाठविण्यात येईल. यावेळी प्रा. शेखर शहा यांच्यासह शंकर पोवार, विजय गुरव, भिकाजी माने, गणेश बरगाले, राहुल कुलकर्णी, रमेश चौगुले, आनंदा बंडगर, रफिक मांगुरे, अमित कागले, संभाजी बंडगर, संताजी भोसले, शिवाजी पाटील, रघू पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com