एसटी गँग फोटो

एसटी गँग फोटो

M89551
संजय तेलनाडे, अभिजित जामदार, इमरान कलावंत, अरविंद मस्के, दीपक कोरे, राकेश कुंभार, आरिफ कलावंत.

संजय तेलनाडेसह सात जण हद्दपार
पोलिस अधीक्षकांची एस.टी. सरकार गॅंगवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.११ : विविध १७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात एस.टी. सरकार गँगला एक वर्षासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. यामध्ये गँगचा प्रमुख आणि माजी नगरसेवक संजय शंकरराव तेलनाडे (रा. गावभाग) यासह सात जणांचा समावेश आहे. याबाबत गावभाग पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हा पोलिस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी मान्यता दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तेलनाडेसह येथील अरविंद सुकुमार मस्के (रा. अवधूत आखाडा), राकेश सुरेश कुंभार, (रा. महादेव मंदिराजवळ, पाटील गल्ली), दीपक सतीश कोरे (राणाप्रताप चौक, गावभाग), इमरान दस्तगीर कलावंत, आरिफ दस्तगीर कलावंत, (दोघे ममता बेकरीमागे, गावभाग), अभिजित सुभाष जामदार (जामदारवाडा नदीवेस नाका) यांच्यावर ही कारवाई झाली. या सात जणांना गावभाग पोलिसांनी आज पोलिस ठाण्यात बोलावून घेत हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या. गुन्हेगारी रोखण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळ्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक टोळ्यांवर हद्दपारची कारवाई झाली; मात्र कुख्यात एस.टी. सरकार गँगवर कारवाई झाली नव्हती. लोकसभा निवडणुका संपताच श्री. पंडित यांनी या टोळीवर हद्दपार कारवाईचा आदेश दिला. संजय तेलनाडे व त्याचा भाऊ सुनील तेलनाडे याच्या नावाने ही गँग कार्यरत आहे. डबल मोका कारवाईत गँगचा प्रमुख संजय तेलनाडे सध्या जामिनावर बाहेर आहे तर सुनील तेलनाडे कारागृहात आहे. टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, बलात्कार, गर्दी मारामारी, फसवणूक, अवैध जुगार व्यवसाय आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, हद्दपारीच्या प्रस्तावाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी चौकशी अधिकारी म्हणून शाहूवाडीच्या पोलिस उपअधीक्षकांची नियुक्ती केली होती. चौकशी अहवालात ही गुन्हेगारी टोळी सर्वसामान्य नागरिकांवर तसेच समाजात दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलखाना मार्गावर गावभाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे पेट्रोलिंग करत होते. यावेळी संजय तेलनाडे दिसून आला. यावेळी तेलनाडे याला पोलिस ठाण्यात आणले आणि त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली.

तेलनाडे गँगवर कडक नजर
तेलनाडे गँगमधील सात जणांना पोलिसांनी जिल्ह्याबाहेर सोडले; मात्र गँगची पार्श्वभूमी पाहता पोलिस यंत्रणा सतर्क व दक्ष आहे. हद्दपार झालेल्या सात जणांचे जिल्ह्याबाहेर जेथे वास्तव्यास असेल तेथील पोलिस ठाण्याचे गँगवर विशेष लक्ष असणार आहे. गँगचे कारनामे पाहता इचलकरंजी शहरातील घडामोडींवर पोलिसांची नजर असणार आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com