इचलकरंजी क्रीडानगरीत शहा यांचे योगदान ः कौंदाडे

इचलकरंजी क्रीडानगरीत शहा यांचे योगदान ः कौंदाडे

Published on

इचलकरंजी क्रीडानगरीत
शहा यांचे योगदान ः कौंदाडे

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ३ : ‘खेळाडू, क्रीडाशिक्षक, क्रीडा संघटक म्हणून प्रा. शेखर शहा यांचे इचलकरंजी क्रीडानगरीत योगदान अतुलनीय आहे. आपल्या कर्तव्यावर निष्ठा ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या शहा यांच्या कार्याचा आदर्श सर्वच क्रीडा शिक्षकांनी घ्यावा,’ असे प्रतिपादन कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू डी. एन. कौंदाडे यांनी केले.
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. शेखर शहा यांच्या इचलकरंजी शहर व परिसरातील क्रीडाशिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू संजय साळुंखे, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक प्रवीण फाटक प्रमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन शहा यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
क्रीडा शिक्षकांनी मैदानावर विद्यार्थ्यांना घडवावे आणि ते विविध स्पर्धांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतील यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रा. शहा यांनी आवाहन केले. शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय गणेश बरगाले यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. राहुल कुलकर्णी यांनी केले. शीला माने यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.