भाजीपाल्याचे दर २० टक्‍क्यांनी घसरले

भाजीपाल्याचे दर २० टक्‍क्यांनी घसरले

09070
09071
इचलकरंजी : भाजीपाला बाजारात हंगामी घेवड्याची नवीन आवक सुरू झाली आहे. तर मुळाही दाखल झाला आहे.
------------------
भाजीपाल्याचे दर २० टक्‍क्यांनी घसरले
फळांची आवक घटलेली ः खाद्यतेलाच्या दरात तीन ते चार रुपयांनी वाढ
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : कधी रिमझिम, तर कधी रिपरिप पावसाने पोषक वातावरण मिळाल्याने भाजीपाल्याची आवक वाढत आहे. त्यातुलनेत मागणी कमी असल्याने दरावर परिणाम होताना दिसत आहे. बाजारात बहुतांश भाजीपाल्याचे दर सुमारे २० टक्क्यांनी घसरले आहेत. कोथिंबिरीचे दर कमालीचे घटले असून, ते अन्य भाज्यांच्या बरोबरीत आले आहेत. मात्र कांदापात, मेथीचे दर चढेच आहेत. हंगामी श्रावण घेवडा, वाल घेवड्याची नवीन आवक सुरू झाली आहे, तर मुळाही बाजारात दाखल झाला आहे.
फळबाजारात फळांची फारशी आवक होताना दिसत नाही. काही फळांची आवक घटलेलीच आहे. मात्र, नवनवीन आंब्यांची आवक सुरूच आहे. परराज्यातून दशेरी, तोतापुरी, लंगडा आंबा बाजारात विक्रीसाठी आहे. फूलबाजारात झेंडूचा भाव कमी झाला आहे. इतर फुलांचे भाव तेजीत आहेत. पुढील आठवड्यात लग्नसराईमुळे दर वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेल बाजारात अनेक दिवसांनी कमालीची वाढ झाली आहे. तेलाचा तुटवडा असल्याने किलोला ३ ते ४ रुपयांची कमाल वाढ झाल्याने विक्रेत्यांनी सांगितले. काही दिवस मागणी कमी असल्यामुळे दरावर फारसा परिणाम दिसला नाही.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला ः टोमॅटो- ४० ते ५०, दोडका- ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची - ६० ते ८०, फ्लॉवर - ५० ते ६०, कोबी- ३० ते ४०, बटाटा - ४० ते ५०, कांदा - ३५ ते ४०, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ४०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- १२० ते १५०, गवारी - ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, दुधी - ३० ते ४०, पालेभाज्या - १० ते १५ पेंढी, कोथिंबीर- १० ते १५, मेथी - २०, कांदापात - २५, शेवगा - ८ ते १० रुपये नग
- - --- - - -
फुले : झेंडू - १०० ते १२०, निशिगंध - २५०, गुलाब - २०० ते २५०, गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १५० ते १६०.
- - -- - -
फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ९० ते १०० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८० ते १००.
-- -
खाद्यतेल : सरकी - ११२ ते ११५, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - ११२ ते ११५, पामतेल - १०५ ते ११०, सूर्यफूल - ११० ते ११५.
-------
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तूरडाळ- १६० ते १७८, मूगडाळ -११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १०० ते ११०, मटकी- १०५ ते ११५, मसूर- ७० ते ७५, फुटाणाडाळ - ८३ ते ८६, चवळी- १०० ते १२०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोले -१२० ते १५०.
-------
धान्यबाजारात घसरण
कडधान्ये, डाळींच्या वाढलेल्या दराला घसरण लागली आहे. पुरवठा चांगला असताना, मागणी फार कमी झाल्याने दर कमी होत आहेत. मूगडाळ, मसूरडाळ, मूग, मटकी, मसूर, फुटाणाडाळ, चवळी, हिरवा वाटाणा, छोले आदींच्या दरात किमान व कमाल उतरण झाली आहे. यामुळे धान्यबाजारातून मोठा दिलासा मिळाला आहे.
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com