पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

Published on

धूमस्टाईलने चोरले
महिलेचे गंठण
इचलकरंजी : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे सोन्याचे गंठण धूमस्टाईलने चोरून नेले. एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली. याप्रकरणी ज्योती श्रीनिवास इंगळे (वय ३६, रा. हौसिंग कॉम्प्लेक्स) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. ही घटना राधाकृष्ण चौक परिसरातील एका राष्ट्रीयकृत बँकेनजीक गुरुवारी (ता. ४) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. राधाकृष्ण चौकातून ज्योती इंगळे या आपल्या मोपेडवरून जात होत्या. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने इंगळे यांच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणवर हिसडा मारला आणि चोरून पसार झाले. नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळाले नाहीत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला.
-----
विद्युत वाहिनीचा
धक्का लागून
शेतकरी जखमी

इचलकरंजी : पंचगंगा नदीकाठावरील शेतात विद्युत वाहिनीचा धक्का लागून शेतकरी जखमी झाला. आप्पासो अण्णासो हेरलगे असे त्यांचे नाव आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून, शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महावितरणच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी पोलिस उपाधीक्षक समिरसिंह साळवे यांच्याकडे केली. नदीलगतच्या शेतातून उच्चदाब विद्युत वाहिन्यांचे अनेक खांब वाकल्याने विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.