विनायक हायस्कूलमध्ये ग्रंथप्रदर्शन

विनायक हायस्कूलमध्ये ग्रंथप्रदर्शन

Published on

विनायक हायस्कूलमध्ये
ग्रंथ प्रदर्शन
इचलकरंजी : विनायक हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन भरवले. याचे उद्‍घाटन मुख्याध्यापक अशोक हुबळे यांनी केले. प्रदर्शनात १५०० हून अधिक पुस्तकांची मांडणी केली. यातून विद्यार्थ्यांना पुस्तके वाचनाचे महत्त्व व पुस्तकांची ओळख झाली. यासाठी संस्थेचे संचालक-ग्रंथपाल विनायक चव्हाण, स्मिता सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.
---
पोस्ट ऑफिसला
विद्यार्थ्यांची भेट
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूलच्या सातवीच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसला भेट दिली. पोस्टल सेवांबद्दल माहिती घेतली. महाराष्ट्र शासनाच्या ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत भेटीचे आयोजन केले. पोस्टमास्तर अनंत पोवार यांनी विद्यार्थ्यांना पोस्टल सेवा, पत्र व्यवहार, तार आणि मनीऑर्डर यांसारख्या सुविधांबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसच्या विविध विभागांना भेटी दिल्या. भेटीमुळे विद्यार्थ्यांना पोस्टल सेवा आणि त्यांचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली. उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका व्ही. एच. उपाध्ये, एस. सी. कोकतरे, यु. वि. कोकतरे, ए. एम. स्वामी आदींनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.