इचलकरंजीत जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धा २८ ला

इचलकरंजीत जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धा २८ ला

Published on

इचलकरंजीत जिल्हा योगासन
निवड चाचणी स्पर्धा २८ ला

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ : कोल्हापूर जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धा २८ जुलैला होणार आहे. स्पर्धा सकाळी साडेसात वाजता येथील स्वामी योगानंद योग भवन हत्ती चौक येथे होणार आहे. स्पर्धक एकापेक्षा अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात, अशी महिती चंद्रशेखर खापणे व सुरेश जाजू यांनी दिली.
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन, गुरुप्रसाद योग परिषद यांच्यावतीने निवड चाचणी स्पर्धा दोन दिवस होणार आहे. स्पर्धा ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक योगासन सिंगल, आर्टिस्टिक योगासन पेअर, ऱ्हिदमिक योगासन पेअर या चार प्रकारांत स्वतंत्र गटात होईल. स्पर्धेतून निवडलेला संघ १६ ते १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशनच्या राज्य स्पर्धेसाठी पाठविला जाईल. स्पर्धेसाठी सब ज्युनियर गट, ज्युनिअर गट, सीनिअर, सीनिअर अ, ब, क गट अशा गटांत होणार आहे.
स्पर्धेत सहभागासाठी आधार कार्डची झेरॉक्स, वयाचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जोखीम प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. अधिक माहितीसाठी सुहास पवळे, नीलेश कागिनकर, पांडुरंग मेटे, रविकुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.