

एअरजेट लूम
कारखान्याला आग
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील एअरजेट लूम कारखान्याला आग लागली. आगीत दोन लूम मशीनचे नुकसान झाले आहे. एकूण ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद कारखानदार रामअवतार बनसिलाल जाजू (वय ६२, रा. आवाडेनगर) यांनी दिली. जाजू यांचा पार्वती औद्योगिक वसाहतीत अमित इंडस्ट्रीज नावाने एअरजेट लूमचा कारखाना आहे. या ठिकाणी २०१८ मध्ये घेतलेल्या दोन एअरजेट लूम मशीनला आज सकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीत प्रत्येकी २० लाख रुपयांच्या दोन एअरजेट लूम मशीन सापडले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.