कबड्डी स्पर्धा सोमवारी

कबड्डी स्पर्धा सोमवारी

Published on

आंतरविभागीय कबड्डी स्पर्धा
उद्यापासून इचलकरंजीत रंगणार
इचलकरंजी, ता. ५ : नाईट कॉलेज, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ हेरिटेज यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा ७ व ८ ऑक्टोबरला जयहिंद मंडळच्या क्रीडांगणावर होतील.
स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (ता. ७) सकाळी १० वाजता इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे, शेखर पाटील, सतीश पाटील, नागेश दिवटे सतीश डाळ्या, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव संभाजी पाटील आदींच्या उपस्थितीत होईल. स्पर्धेत सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील विभागीय स्पर्धेतून पात्र ठरलेले बारा संघ व वैयक्तिक निवड चाचणीसाठी ५० खेळाडू असे २०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील. स्पर्धेमधून झुंझुनू (राजस्थान) येथे १८ ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी आणि १० ते १५ नोव्हेंबर या गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अश्वमेध क्रीडा स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कबड्डी पुरुष संघातील खेळाडूंची निवड होईल. स्पर्धेस शिवाजी विद्यापीठ निवड समिती सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. बी. एन. उलपे (वाय. सी. कॉलेज) प्रा. आयुब कच्छी (अहिरे कॉलेज, विटा), निरीक्षक म्हणून प्रा. संजय पाटील, (माडखोलकर कॉलेज, चंदगड) हे उपस्थित राहतील. स्पर्धा दोन दिवस सकाळ व रात्री अशा दोन सत्रांत होतील, अशी माहिती प्र. प्राचार्य डॉ. विरुपाक्ष खानाज व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. देवेंद्र बिरनाळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com