निरीक्षणादरम्यान आढळले ७० वर पक्षी

निरीक्षणादरम्यान आढळले ७० वर पक्षी

Published on

9822
इचलकरंजी : पंचगंगा नदी परिसरातील पक्षी निरीक्षण उपक्रमात नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
..........
निरीक्षणादरम्यान आढळले ७० वर पक्षी

ग्रीन इचलकरंजीच्या वतीने पंचगंगा नदी परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १८ : पर्यावरण संवर्धन व जैवविविधतेच्या जागरूकतेसाठी कार्यरत असलेल्या ग्रीन इचलकरंजी संस्थेच्या वतीने पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन केले होते. भारताचे प्रख्यात पक्षी निरीक्षक डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त पंचगंगा नदी परिसरातील वरद विनायक गणपती मंदिराजवळ सकाळच्या सत्रात दोन दिवस पक्षी निरीक्षण उपक्रम घेण्यात आला. निरीक्षणादरम्यान विविध प्रकारचे ७० हून अधिक पक्षी पाहायला मिळाले.
पक्ष्यांच्या विविध प्रकारांचा परिचय उपक्रमादरम्यान पर्यावरण अभ्यासक चित्कला कुलकर्णी यांनी करून दिला. उपस्थितांना विविध पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांची वैशिष्ट्ये, जीवनशैली तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे व्यवहार यासंदर्भात माहिती दिली. तसेच त्यांनी पक्ष्यांचे निरीक्षण कौशल्य विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगून पक्षी ओळखण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी विविध प्रकारचे ७० हून अधिक पक्षी पाहायला मिळाले. त्यामध्ये स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होता.
दरम्यान, निरीक्षणदरम्यान कुलकर्णी यांनी पक्ष्यांच्या जीवनशैलीविषयी विस्तृत माहिती देताना त्यांच्या आवाजांचे महत्त्व, अन्नसाखळीतील योगदान आणि पर्यावरण संतुलनासाठी पक्ष्यांचे कार्य कसे आवश्यक आहे हे स्पष्ट केले. यामुळे उपस्थितांना पक्ष्यांविषयीची अधिक माहिती मिळाली.
या उपक्रमामुळे सहभागी पर्यावरणप्रेमींना पक्षी जगतातील अनोखे रहस्य उलगडण्याचा अनुभव मिळाला आणि पक्षी संरक्षणाची गरज अधिक तीव्रतेने जाणली. ग्रीन इचलकरंजीची ही उपक्रम परंपरा भविष्यातही अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. उपक्रमात पालकांनी आवर्जून आपल्या मुलांसह सहभाग घेतला. तसेच पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. संतोष उमराणे, योगेश सुतार, सारंग भांबुरे, प्रतीक साठे, सूरज डिंगणे, सुनीता वर्मा, ओंकार चौगुले, रोहन मराठे, सुनील बावडेकर, अंकुश गरगटे आदी उपस्थित होते.
................
दिसलेले काही प्रातिनिधिक पक्षी
धोबी पिवळा, ग्रे, नदीसुरे, पान कावळा, कोतवाल, बुलबुल, खाटिक-गांधारी, साळुंकी, दयाळ, पाकोळी-देवकन्ही, चिंट्या, हळदी-कुंकू, खंड्या, चित्रबलाक, चंडोल, चिखल्या, वाचंक, गायबगळा, टिटवी, वेडा राघू, ग्रेहेरॉन, पाँन्डहेरॉन, जांभळी पाणकोंबडी, छोटा बगळा, मध्यम बगळा, राखी बगळा, बदक, शेकाट्या, कापशी घार, साधी घार, ब्राह्मणी घार, चमच्या-स्पुनबिल, रेडशॅंक मैना, भांगपाडीमैना, रोझी मैना, वटवट्या, डोमकावळा, चरबगळा, कुदळे, टिटवी आदी.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com