टोळी वाढदिवस गुन्हा

टोळी वाढदिवस गुन्हा
Published on

बंदी आदेशाचा भंग
करून वाढदिवस साजरा
करणाऱ्यावर गुन्हा

इचलकरंजी : सार्वजनिक ठिकाणी बंदी आदेशाचा भंग करत केक कापून वाढदिवस साजरा करणारा टोळक्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह जर्मनी टोळीतील मोकातील चार संशयित आरोपींचा समावेश आहे. रुपेश पंडीत नरवाडे (वय 24, रा. दत्तनगर, कबनूर), गौरव वसंत मरडे (वय 24, रा. इचलकरंजी), ओमकार सुनिल धांतुडे (वय 22, रा. गावभाग, इचलकरंजी) द्वारकाधीश खंडेलवाल (वय 25) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी (ता.16) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास निरामय रिंग रोडवरील शांतीनिकेतन शाळेसमोर संशयित आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून टेबल लावून केक कापला. यामुळे नागरिकांच्या ये-जा आणि वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पोलिस हवालदार अनिल बबन पाटील यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com