

हौसिंग सोसायटीत अपहार,
दहा जणांविरुद्ध
गुन्हा दाखल
इचलकरंजी : येथील महेश को-ऑप. हौसिंग सोसायटीत ७९ सभासदांकडून दुरुस्ती कामासाठी गोळा केलेल्या निधीचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संस्थेचे तत्कालीन चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव व संचालक मंडळातील एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी एकूण चार लाख दोन हजार ५९० रुपयांचा अपहार केला. याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक सुभाष देशमुख (वय ५३) यांनी दिली.
तत्कालीन चेअरमन गोविंदलाल बालुराम बजाज, व्हा. चेअरमन श्रीवल्लभ चंपालाल तोतला, संचालक रामनिवास नरसिहदास भराडिया, श्यामसुंदर गणपतलाल बियाणी, हरिप्रसाद मोहनलाल पोरवाल, ओमप्रकाश कन्हैयालाल लड्डा, श्रीगोपाल केसरीमल बियाणी, उज्वला सत्यनारायण बजाज, सुधा राजकुमार दमाणी, सचिव सुभाष पन्नालाल मोदाणी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.