

37293
इचलकरंजी : स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, आमदार राहुल आवाडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
--
इचलकरंजीत विविध उपक्रमांनी
महामानवाला अभिवादन
इचलकरंजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहर व परिसरात उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासूनच विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळा व न्यायालयाजवळील पुतळ्याला दिवसभर नागरिकांनी पुष्पांजली अर्पण केली. याठिकाणी सामाजिक संस्थांकडून आंबेडकरांच्या पुस्तकांचे वाटप केले. फुलांनी सजवलेले मंडप, प्रेरणादायी विचारांचे फलक व घोषणावाक्यांमुळे शहरात जागृती निर्माण झाली होती. जयंतीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्याख्याने, स्पर्धा आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी विविध भागांतून मिरवणुका काढल्याने जयंती उत्साहात साजरी झाली.
इचलकरंजी महापालिका
स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती व अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, आमदार राहुल आवाडे, उपमहापौर अनिल डाळ्या यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन सभापती अरुणा बचाटे, मागासवर्गीय समिती सभापती रुबन आवळे, शिक्षण सभापती विद्या साळुंखे, महिला बालकल्याण सभापती रूपाली सातपुते, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, शिक्षण समिती उपसभापती पूनम माळी, नगरसेवक रवी रजपुते, राजू बोंद्रे, योगेश पाटील, अविनाश कांबळे, नगरसेविका प्रियांका इंगवले, मनीषा कुपटे, आदी उपस्थित होते.
डीकेएएससी कॉलेज
प्रा. डी. ए. यादव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. डॉ. सुभाष जाधव, डॉ. एस. टी. इंगळे, प्रबंधक आर. बी. जोग, डॉ. ए. एच. बोगुलवार, डॉ. सुनील भोसले, प्रा. पूजा पारिशवाड, प्रा. रोहित शिंगे, प्रा. संदीप पाटील, प्रा. ज्योत्स्ना सोनवणे यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
कन्या महाविद्यालयात
प्रा. संगीता पाटील आणि प्रा. अनिल कुंभार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. डॉ. त्रिशला कदम होत्या. प्रा. मनीषा गवळी प्रा. प्रिया सुतार, प्रा. शाहीन फकीर, प्रा. निकिता बडे, प्रा. अनुराधा देशटवार, अनिल सुतार, पवन माने उपस्थित होते. डॉ. विठ्ठल नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रमिला सुर्वे यांनी आभार मानले.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूल
गणपती घोलप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. माही जाधव, अमृता पाटील यांनी मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन मानसी ठाकूर यांनी केले. संतोष गांगोडे यांनी आभार मानले. साईन दुभाषिक रूपाली सलगर यांनी केले.
समाजवादी प्रबोधिनी
शकील मुल्ला यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पांडुरंग पिसे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सर्वांगीण समतावादी विचाराचे महत्त्व सांगितले. ज्येष्ठ गायिका, पद्मभूषण आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रसाद कुलकर्णी, अन्वर पटेल, नौशाद शेडबाळे, महंमद मुल्ला, शहाजी धस्ते, अशोक माने, पांडुरंग आगम, कुमार मिणचे, इकबाल पखाली, रमेश चचडी आदी उपस्थित होते.
डॉ. एस. पी. पाटील आयुर्वेदिक कॉलेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मिथुन रसाळ, संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यालयीन अधीक्षक किशोर निकम, किरण पाटील, विश्वजित पाटील, गौरव रेंदाळे, नितीन तेली, प्रथमेश परीट, अनिकेत खंडारे आदी उपस्थित होते. विश्वजित पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.