काम पूर्ण सीसीटीव्ही कुलूपबंद

काम पूर्ण सीसीटीव्ही कुलूपबंद
Published on

फोटो - संग्रहित सीसीटीव्ही
--
काम पूर्ण पण इचलकरंजीत
सीसीटीव्ही प्रकल्प कुलूपबंद
गुन्ह्यांच्या तपासासाठी यंत्रणा सुरू करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २२ : शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा सीसीटीव्ही प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या पूर्णत्वास गेला असतानाही अद्याप प्रत्यक्ष कार्यान्वित झालेला नाही. कॅमेरे बसवणे, केबल जाळे, नियंत्रण कक्ष उभारणी अशी सर्व कामे पूर्ण झाली असूनही गावभाग पोलिस ठाण्यातील नियंत्रण कक्ष कुलूपबंद अवस्थेत आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी सुरू होणार याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे.
शहरातील झोपडपट्टी भागांपासून प्रमुख रस्ते व चौकांपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला एसटीक्यूसी प्रमाणपत्राअभावी पीटीझेड कॅमेरे बसवण्याचे काम प्रलंबित होते. मात्र आता त्यालाही परवानगी मिळाल्याने संबंधित मक्तेदाराने संपूर्ण यंत्रणा उभारून पूर्ण केली आहे. तरीही उद्‌घाटन न झाल्यामुळे हा प्रकल्प सुरू झालेला नाही. दरम्यान, गावभाग पोलिस ठाण्यात अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारला असला तरी त्याठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही.
परिणामी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली मनुष्यबळाची यंत्रणा अपूर्णच आहे. सध्या शहरात एखादा गुन्हा घडल्यास संबंधित फुटेज पाहण्यासाठी पोलिस व नागरिकांना गावभाग ठाण्यात जाऊन गोपनीय विभागाची परवानगी घ्यावी लागत आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत असून गुन्हे तपासात विलंब होण्याची शक्यता वाढत आहे.
शहरात वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि संशयित हालचालींच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू होणे गरजेचे असताना हा प्रकल्प रखडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
--------
पोलिसांनी पुढाकार घ्यावा
सीसीटीव्ही प्रकल्पासाठी निधी महापालिकेकडून मंजूर झाला असला तरी त्याचा प्रत्यक्ष वापर आणि नियंत्रण पोलिसांकडेच राहणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे. तातडीने मनुष्यबळाची नेमणूक करून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केल्यास शहरातील सुरक्षा व्यवस्थेला आधार मिळणार आहे.
----
दृष्‍टिक्षेपात सीसीटीव्ही यंत्रणा
*बुलेट कॅमेरे - ९३
*एएनपीआर कॅमेरे - २०
*पीटीझेड कॅमेरे - ८
*एकूण - १२१
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com