हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसाठी मंगळवारी बोली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसाठी मंगळवारी बोली
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसाठी मंगळवारी बोली

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसाठी मंगळवारी बोली

sakal_logo
By

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीसाठी
जयसिंगपूरला आज सवाल बोली

जयसिंगपूर, ता. ३० : येथील श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जयसिंगपूर व कल्पद्रूम आराधना महामंडळ महामहोत्सव समितीतर्फे सुरू असलेल्या महामंडळ विधान महोत्सवाअंतर्गत गुरुवारी (ता. २) हेलिकॉप्टरमधून भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यासाठी हेलिकॉप्टरची सवाल बोली मंगळवारी (ता. ३१) दुपारी तीन वाजता धर्मसभा मंडपात होणार आहे.
तसेच महामहोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. ३) भव्य रथोत्सवाचे आयोजन केले असून, या रथोत्सवासाठी सवाल बोली एक फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता धर्मसभा मंडपात होणार असल्याची माहिती श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व कल्पद्रूम आराधना महामहोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यासाठी लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या पटांगणामध्ये हेलीपॅडची उभारणी केली आहे. या ठिकाणाहून हेलिकॉप्टरचे उड्डाण होणार आहे. तसेच अंतिम दिवशी होणारा रथोत्सव नेत्रदीपक रोषणाई व विविध वाजंत्री पथकांच्या सहभागाने भव्य आणि दिव्य असा होणार आहे. रथोत्सवामध्ये एका चांदीच्या रथासह सात रथ, दोन हत्ती व २१ घोडी यांचा समावेश असणार असल्याची माहिती आमदार पाटील यड्रावकर यांनी दिली.