
इंटर्नशिपसाठी ४०२ विद्यार्थ्यांची निवड
इंटर्नशिपसाठी ४०२ विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर, ता. १२ : २०२२-२३ शैक्षणिक वर्षात स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व लिबरल आर्टस् या विभागातील अंतिम वर्षाच्या ४०२ विद्यार्थ्यांची निवड देशभरातील विविध नामवंत कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी झाली. त्याचा उद्देश औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या आवश्यकतेनुसार इंडस्ट्री रेडी ग्रॅज्युएटस् व बिझनेस रेडी प्रोफेशनल्स तयार करणे व औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अभ्यासक्रम तयार करणे हा आहे.
भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) मुंबई, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) बंगलुरू, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) दिल्ली व नाशिक, टाटा सोलर पॉवर मुंबई, टाटा बोईंग एरोस्पेस लि. हैदराबाद, टाटा मोटर्स कार प्लांट पुणे, गरुडा एरोस्पेस प्रा. लि. चेन्नई, स्टार एअर बंगलुरू, एअरटेल एक्स लॅब, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि. कोल्हापूर, इमरटेक इनोवेशन्स मुंबई, रॉस इक्विपमेंट प्रा. लि. पुणे, विलो माथेर अँड प्लांट पुणे, मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लि. पुणे, नांदेड सिटी कन्स्ट्रक्शन अँड कंपनी प्रा. लि. पुणे, टीव्ही ९ मराठी मुंबई, एबीपी माझा मुंबई या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.
संजय घोडावत विद्यापीठातील ‘इंडस्ट्री युनिव्हर्सिटी रिलेशन्स’ हा विशेष विभाग विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिपसाठी कार्यरत आहे. यासाठी विभागाचे संचालक एन. व्ही. पुजारी, समन्वयक डॉ. एस. व्ही. ढणाळ, स्वानंद कदम, गुरुनाथ मचले, विकास भंडारी, एस. सुलतान, जयप्रकाश पाटील आदींनी प्रयत्न केले. संस्थेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डीन अकॅडमिक्स डॉ. उत्तम जाधव यांनी यासाठी मार्गदर्शन केले.