
महारक्तदान शिबिरात २३५० जणांचे रक्तदान
04933
टाकळीवाडी : महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गुरुदत्त शुगर्सचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल माधवराव घाटगे यांच्यासह मान्यवर.
------------
महारक्तदान शिबिरात
२३५० जणांचे रक्तदान
जयसिंगपूर, ता.२२: श्री गुरुदत्त शुगर्सचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल माधवराव घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चला माणूसकिवर प्रेम करूया, रक्तदानातून जीवनदान देऊया’ हे बीद्र घेऊन आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात २३५० दात्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या प्रोत्साहनातून व बंधू धिरज घाटगे यांच्या मदतीने दरवर्षी महारक्तदान शिबिराचा संकल्प राहूल घाटगे यांनी जपला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी विविध गावांमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. चार वर्षात ८५०० रक्तदात्यांनी रक्तदान करुन शुभेच्छा दिल्या. अनेक गरजू रुग्णांनाही गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून आतापर्यंत रक्ताचा पुरवठा केलेला आहे. कारखाना परिसरातील खिद्रापूर, राजापूर, बस्तवाड, मजरेवाडी, अकिवाट, सैनिक टाकळी, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, घोसरवाड, हेरवाड, चिंचवाड, जयसिंगपूर, कल्लोळ आदी गावांमध्ये हे शिबिर झाले. रक्तदाते व शिबिरास मेहनत घेतलेल्यांचे राहूल घाटगे यांनी आभार मानले.