उदगाव सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदगाव सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर
उदगाव सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर

उदगाव सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर

sakal_logo
By

05105
उदगाव: सरपंच कलीमुन नदाफ यांच्यावर अविश्वास मंजूर झाल्याने ग्रामपंचायत सदस्य व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
-----------
उदगाव सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर
विशेष सभेचे आयोजन; स्वाभिमानीच्या सदस्यांकडून तहसिलदारांकडे दाखल
जयसिंगपूर, ता. २४ : उदगाव (ता. शिरोळ) येथील सरपंच कलीमुन बाळासो नदाफ यांच्यावर स्वाभिमानीच्या सदस्यानी तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. यासाठी आज विशेष सभा घेण्यात आली. यात स्वाभिमानीच्या ९ सदस्यांबरोबरच कॉंग्रेस, शिवसेना व आमदार यड्रावकर गटाच्या ५ सदस्यानी अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याने १४ विरुद्ध २ ने सरपंच नदाफ यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. अध्यक्षास्थानी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ होत्या.
दरम्यान, सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर होताच स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. उदगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानीला ९ तर विरोधी काँग्रेस, शिवसेना, यड्रावकर गट आघाडीला ८ जागा मिळाल्या होत्या. यात कलीमुन नदाफ या स्वाभिमानीकडून निवडून आल्या होत्या. नदाफ यांना विरोधी आघाडीने फोडून त्यांना सरपंच केले होते. त्यामुळे स्वाभिमानीची हातात आलेली सत्ता हिसकावून घेतली होती. विरोधी आघाडीतील हिदायत नदाफ यांना उपसरपंच केले होते. नदाफ यांनी राजीनामा देऊन स्वाभिमानीला पाठींबा दिला होता. त्यानंतर स्वाभिमानीचे रमेश मगदूम यांना उपसरपंच केले होते. सरपंचांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. स्वाभिमानीच्या ९ सदस्यांनी राजीनामा देऊन सरपंच यांच्या विरोधात पुन्हा तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर ९ सदस्यांनी राजीनाम्यावर हरकती घेऊन तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे १७ मार्चला सरपंच नदाफ यांच्याविरोधात अविश्वास दाखल केला होता. प्रशासकीय काम ग्रामविकास अधिकारी डी.आर. कांबळे यांनी पाहिले. स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक, प्रा. राजाराम वरेकर, प्रकाश बंडगर, विजय कर्वे, भरत पाटील, बंडेश साखळे आदिंनी जल्लोष केला. दरम्यान जयसिंगपूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
----------
ठरावाविरूद्ध दोन मते
तहसीलदार यांनी आज विशेष सभा बोलावली होती. यात आघाडीचे सदस्य दिलीप कांबळे हे गैरहजर होते. सरपंच यांच्या ठरावाविरुद्ध सरपंच नदाफ व सदस्य दीपिका कोळी यांची २ मते मिळाली. ठरावाच्या बाजूने स्वाभिमानीचे उपसरपंच सौरभ पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिदायत नदाफ, मेघराज वरेकर, जगनाथ पुजारी, रमेश मगदूम, सुनीता चौगुले, पूजा जाधव, भारती मगदूम, जोत्स्ना गदगडे तर विरोधी आघाडीचे सदस्य अरुण कोळी, सलीम पेंढारी, सावित्री मगदूम, सुवर्णा सुतार, रुक्मिणी कांबळे यांची १४ मते मिळाल्याने सरपंच नदाफ यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाला.