मगदूम कॉलेजच्या संशोधन प्रकल्पास मान्यता
मगदूम कॉलेजच्या संशोधन प्रकल्पास मान्यता
जयसिंगपूर ः येथील डॉ. जे. जे. मगदूम फार्मसी कॉलेज आणि डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या संशोधन प्रकल्पास भारत सरकारच्या आरजीएसटीसी (राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन) संस्थेने मान्यता देऊन तीन लाख ४० हजारांची आर्थिक मदत जाहीर केली. चिकनगुण्यावर प्रभावी औषधप्रणाली शोधण्याबद्दलचा हा प्रकल्प अनेक रुग्णांना वरदान ठरणार आहे. प्रकल्पाची संकल्पना प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांची असून प्रकल्पाचे संचालन राहुल गस्ते व महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा माळी हे करत आहेत. डॉ. जे. जे. मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्रमोद बुद्रुक, प्रियंका चौगुले हे प्रकल्पातील तज्ज्ञ म्हणून काम पाहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष विजय मगदूम, उपाध्यक्षा सोनाली मगदूम यांनी याबद्दल अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

