

06081
उद्योगपती संजय घोडावत
यांना जीवनगौरव पुरस्कार
‘एचडीएफसी’तर्फे बाराजणांचा सन्मान
जयसिंगपूर, ता. १८ : उद्योग-शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या बारा गौरवमूर्तींचा यावेळी सन्मान झाला. एचडीएफसी बँकेने सयाजी हॉटेलमध्ये गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रमुख पाहुणे छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात उद्योग, व्यवसाय, शिक्षण, क्रीडा, संस्कृती या माध्यमातून कोल्हापूरचा विकास राजर्षी शाहू महाराजांनी केला. हाच वारसा सर्वजण चालवत आहात. संजय घोडावत यांनी घोडावत उद्योगसमूह, विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून कोल्हापूरचे नाव जगात उंचावले आहे.’ उत्तरोत्तर कोल्हापूरचा विकास सर्वांच्या माध्यमातून होवो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
घोडावत म्हणाले, ‘मला मिळालेला पुरस्कार मातीची सेवा केल्याबद्दल मिळत आहे, याचा खूप आनंद आहे. १९९४ पासून एचडीएफसी बँकेशी आपले नाते आहे. पुरस्कारामुळे हे नाते अधिक घट्ट झाले आहे. याबद्दल संयोजकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी बँकेचे सर्कल हेड गौरव सिन्हा, विक्रांत नागरे, मेहुल नागदा यांची प्रमुख उपस्थिती होती. अजय डोणे यांनी सूत्रसंचालन केले. हर्षल मेहेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.