रामलिंग मंदिरात दर्शनासाठी गर्दी

रामलिंग मंदिरात दर्शनासाठी गर्दी

रामलिंग मंदिरात
दर्शनासाठी गर्दी
जयसिंगपूर : उदगांव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठावरील पुरातन स्वयंभु श्री रामलिंग मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच कृष्णा नदीत स्नान करून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. श्री रामलिंग देवास बेल फुले व तांदळाची मुठ वाहण्यात आली. श्रावणात शिरोळ तालुक्यासह मिरज, सांगली परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. येथील गुरव बंधुंकडून पहाटे दुग्ध अभिषेक यासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी बारा वाजता महाआरती झाली. त्यानंतर भाविकांना अल्पोपहाराचे वाटप केले.
-----------
गोवंशहत्या कायदा
रद्दसाठी मोर्चाचा इशारा
पेठवडगाव : गोवंशहत्या बंदी कायद्यामुळे शेतकरी, व्यापारी व त्यावर आवलंबुन असणाऱ्या घटकांचे हाल होत आहे. त्यांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसुल करणारा वर्ग तयार होत आहे. याला आळा घालण्यासाठी गोवंशहत्या कायदा रद्द करावा मागणीसाठी सोमवारी (ता. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. येथील वडगाव मार्केट यार्डमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकरी नेत्या शर्वरी पवार, मोहन मदने उपस्थित होते. लक्ष्मीकांत पाटील, पांडुरंग गायकवाड, नाभिराज देसाई, रमेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. धनपाल माळी, संभाजी हजारे, दिनकर घस्ते, विष्णू घाटगे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com