कामांची निकड पाहून विकासनिधीचे वाटप

कामांची निकड पाहून विकासनिधीचे वाटप

06478
कवठेगुलंद : आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. शेजारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ.
----------
कामांची निकड पाहून विकासनिधीचे वाटप
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर ः शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १३ : आमदार निधी व शासनाच्या वेगवेगळ्या खात्याअंतर्गत मिळणारा निधी यातून गावांमध्ये विकास कामे होत असतातच. गाव कारभार करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विकासकामांची सूचना करत असतात. त्याप्रमाणे त्या कामांची निकड पाहून विकास निधीचे वाटप केले जात असते. मागील चार वर्षात मी कधीच पक्ष, संघटना, अथवा गट तट पाहून गावांना विकासासाठी निधी दिला नसल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दानोळी जिल्हा परिषद मतदार संघातील गावांच्या आढावा बैठकीत दिली.
शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर गुरुवारपासून असलेल्या आमदार यड्रावकर यांनी शुक्रवारी (ता.१३) शिरोळ तालुक्यातील दानोळी, नांदणी, उदगाव व आलास या चार जिल्हा परिषद मतदार संघातील २९ गावांचा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकांमधून आढावा घेतला. आमदार यड्रावकर यांनी विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीमधून गावागावांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा त्या त्या गावातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याकडून घेतला. सुरू असलेल्या व प्रलंबित असलेल्या अनेक कामांबाबत व अडचणीबाबत बैठकीत सूचना दिल्या.
विकासकामांबाबत पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचना आमदार यड्रावकर यांनी जाणून घेतल्या. पदाधिकाऱ्यांनी मांडलेले प्रश्न मार्गी लावले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी दानोळी जिल्हा परिषद मतदार संघातील कवठेसार, दानोळी, निमशिरगाव, तमदलगे, जैनापुर, चिपरी, उमळवाड व कोथळी नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातील नांदणी, हरोली, धरणगुत्ती, संभाजीपूर व मौजे आगर, उदगाव जिल्हा परिषद मतदार संघातील उदगाव, चिंचवाड,अर्जुनवाड, घालवाड कुटवाड, कनवाड, हसुर व शिरटी तसेच आलास जिल्हा परिषद मतदार संघातील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी व नृसिंहवाडी अशा २९ गावांचा आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com