पाऊस

पाऊस

शिरोळ तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस
जयसिंगपूर, ता.६: शिरोळ तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे साखर कारखान्याच्या ऊस तोडीचे वेळापत्रक कोलमडणार आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. परिणामी थंडीदेखील गायब झाली होती. अशातच शनिवारी रात्री आठच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे चिंता निर्माण केली आहे. ऊसदराच्या आंदोलनाने आधीच तीन आठवडे ऊस तोडीचा हंगाम लांबला होता. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आठ दिवस जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचाही परिणाम तोडीवर झाला. हंगाम हळूहळू वेग घेत असतानाच शनिवारी अवकाळीने हजेरी लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com