इचलकरंजीला पाणी देणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा नाही-शेट्टी

इचलकरंजीला पाणी देणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा नाही-शेट्टी

07881, 07882
शहापूर : प्रचार सभेत बोलताना राजू शेट्टी.
...
इचलकरंजीला पाणी मीच देणार
राजू शेट्टी : तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही
जयसिंगपूर, ता. ३०: ‘इचलकरंजी शहरास जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही. शहरास कोणत्याही परिस्थिती मीच पाणी देणार,’ अशी ग्वाही स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
ते शहापूर-इचलकरंजी येथील जाहीर सभेत बोलत होते. शहापूर येथील स्वामी अपार्टमेंट ते शहापूर बसस्थानकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. ‘इचलकरंजी शहरास पाणी देणार ही माझी गॅरंटी आहे. शहरास पाणी हे कसे द्यायचे ते मी बघेन. तुम्ही फक्त मला साथ द्या,’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शेट्टी म्हणाले, ‘गतवेळच्या निवडणुकीत पाण्यासाठी कारण नसताना माझा बळी घेण्यात आला. तरीही पाण्याचा प्रश्न त्यांना सोडविता आला नाही. इचलकरंजी शहराला कोणत्याही परिस्थिती शुध्द व मुबलक पाणी मिळायला पाहिजे, ही माझी पहिल्यापासूनची ठाम भूमिका आहे व ते संघर्ष करूनच मिळवावे लागेल. वारणा पाणी योजनेला मी कधीही विरोध केला नाही. माझे नाव पुढे करून त्यावेळी माझी नाहक बदनामी करणे हा व्यापक कटाचा भाग होता. सुळकूड व वारणा पाणी योजनेला विरोध करणारे हे माझे विरोधक आहेत. हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, समरजित घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, उल्हास पाटील यांच्या तीव्र विरोधामुळे मंजूर असलेली सुळकूड योजना रखडली आहे. इचलकरंजीच्या स्थानिक नेत्यांची वारंवार बदलणारी भूमिका ही शहरास पाणी मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. निवडणूक आचारसंहिता संपल्यावर माझे पहिले काम शहरासाठी पाणी लढ्यासाठी चळवळ उभी करणे हेच आहे. शहराला पाणी मिळण्यासाठी मी कोणत्याही स्तरावर जायला तयार आहे. यासाठी इचलकरंजी शहरातील लोकांची मला साथ हवी. सूळकूड योजना मंजूर असताना देखील मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्याच नेत्यांच्या दबावापुढे त्यांनी समितीचे नाटक केले आहे. हा एक कुटील डाव आहे. तो मी हाणून पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यंत्रमागधारकांच्या न्याय मागण्यासाठी लढा उभारून शासनस्तरावर त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.’
यावेळी प्रा. जालिंदर पाटील, सावकर मादनाईक, सागर संभूशेटे, विकास चौगुले, बाळगोंडा पाटील, जयकुमार कोले, आण्णासो शहापुरे, सतीश मगदूम, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com