जयसिंगपूर बसस्थानकाचे विस्तारीकरण युद्धपातळीवर

जयसिंगपूर बसस्थानकाचे विस्तारीकरण युद्धपातळीवर

08117
जयसिंगपूर : बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जयसिंगपूर बसस्थानकाचे विस्तारीकरण युद्धपातळीवर

सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३ : येथील बसस्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विस्तारीकरणानंतर सुसज्ज बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
कन्यागत महापर्वकाळाच्या माध्यामातून तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी एक कोटीमधून उभारण्यात आलेले बसस्थानक अपुरे पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. शिवाय एस. टी. बसेस लावण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर बसस्थानक विस्तारीकरण करण्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून सध्या बसस्थानकांच्‍या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.
जयसिंगपूर बसस्थानक हे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील महत्त्‍वाचे बसस्थानक आहे. सध्या असलेले बसस्थानक अंत्यत अपुरे पडत असून, प्रवाशांना उभे राहावे लागत आहे. शिवाय सांगली, मिरज, कोथळी, चिंचवाड, दानोळी, कवठेसार, उदगांव यांसह अन्य मार्गांवरील जाणाऱ्‍या एस. टी. बसेस लावण्यासाठी जागा नसल्याने बस येईल तेथून जावे लागत आहे.
सकाळी नऊ ते बारा व सायकांळी चार ते सात वाजेपर्यंत बसस्थानकात मोठी गर्दी असते. यावेळी प्रवाशांना बसायला जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे या बसस्थानकांचे विस्तारीकरण व्हावे, अशी मागणी होती. यासाठी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दोन वर्षांपूर्वी दोन कोटी निधी मंजूर केला होता. सध्या असलेल्या बसस्थानकालगतच्या दोन्ही बाजूला विस्तारित फलाट करण्यात येत आहेत. शिवाय प्रवाशांना येथे बैठक व्यवस्था यांसह विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com