झेले हायस्कूलमध्ये पर्यावरण दिनी वृक्षारोपण

झेले हायस्कूलमध्ये पर्यावरण दिनी वृक्षारोपण

झेले हायस्कूलमध्ये
पर्यावरण दिनी वृक्षारोपण
जयसिंगपूर : येथील बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळा प्रशासन, रोटरी ग्रीन सिटी, जयसिंगपूर व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन तर्फे शालेय परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले. स्कूल कमिटीचे अध्यक्ष गजकुमार माणगावे, रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुदर्शन कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प केला. रोटरी ग्रीन सिटीचे सदस्य कोरे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल कुंभार, उपाध्यक्ष महावीर पाटील, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे डीलर हर्षद माणगावे, अतुल टारे, राजू मादनाईक, स्कूल कमिटी सदस्य दादा पाटील-चिंचवाडकर, नितीन पाटील, मुख्याध्यापक भारत सावळवाडे, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com