पर्यावरण दिन

पर्यावरण दिन

‘तापमानवाढीवर
वृक्षारोपणच उपाय’
जयसिंगपूर : शेडशाळ (ता. शिरोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरण दिन झाला. सहाय्यक शिक्षक जमादार यांनी पर्यावरण दिन व वृक्षारोपण काळाची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या घरापासूनच याची सुरुवात झाली तरच पर्यावरणाबद्दल आस्था निर्माण होईल. यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे. जागतिक तापमान वाढीपासून जर आपले संरक्षण करायचे असेल तर आपण वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आपणही करूया व दुसऱ्यांनाही सांगूया, अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. शाळा परिसराची सफाई केली. यावेळी शालेय विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com