घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी मार्गदर्शन शिबीर

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी मार्गदर्शन शिबीर

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये
गुरुवारी मार्गदर्शन शिबिर
जयसिंगपूर, ता. १० : प्रथम वर्ष आभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना, करिअरची योग्य दिशा, या विषयावर विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबिर होणार आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजता सेमिनार हॉल, दुसरा मजला, सी ब्लॉक, संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे होईल. घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी मार्गदर्शन करणार आहेत.
मेरिट लिस्ट विश्‍लेषण, सीट डिस्ट्रीब्यूशन मॅट्रिक्स, स्टेप इन फिलिंग ऑप्शन फॉर्म व स्टेट एक्सेप्टेशनस रुल्स या प्रवेशासंदर्भातील महत्त्‍वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. इंजिनिअरिंगचे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत.
संजय घोडावत इन्स्टिट्यूटला ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई), नवी दिल्ली यांनी पदवी इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये पदविका अभियांत्रिकीसोबतच पदवी अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स अॅन्‍ड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्‍ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स  मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, अल्पमुदतीचे अभ्यासक्रमांत डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अॅन्‍ड मॅन्युफॅक्चरिंग, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, डिप्लोमा इन फोटोग्राफी अॅन्‍ड फोटोग्राफी शाखा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com