हसुरवर काविळीची दहशत

हसुरवर काविळीची दहशत

हसूरमध्ये काविळीचे ३१ वर रुग्ण
आरोग्य यंत्रणेकडून गावातील सर्वांची आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.१०: हसूर (ता. शिरोळ) गावात सोमवारी काविळीचे नव्याने १६ रुग्ण आढळले. त्याने गावातील कावीळग्रस्त रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. गावातील अडीच हजार रुग्ण व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी हसूर येथे घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात केले आहेत. गावात दोन हजार ४५९ रुग्ण नागरिकांची तपासणी झाली. गरजेनुसार उपचार केले जात आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
हसूर येथे १७ व १८ मे रोजी यात्रा होती. यात्रा संपल्यानंतर काही दिवसांत काविळीचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यात्रेमध्ये बर्फाचे गोळे, भेलपुरी, पाणीपुरी खाल्लेल्या नागरिकांना काविळीची लागण उघडकीस आले आहे. शनिवारी १६ जणांना काविळीची लागण झाली होती. सोमवारी ही संख्या ३१ वर पोहोचली.
रुग्णांना शिरोळ ग्रामीण रुग्णालय व घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत आहे. सोमवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी पुन्हा हसूर येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी विस्तार अधिकारी पी. एन. महाडिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन डोणे, डॉ. विवेकानंद हंकारे यांच्यासह पथक हसूर येथे कार्यरत आहे.

यात्रा संपली आणि साथ सुरू झाली
हसूर गावातील यात्रेत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. उकाड्यामुळे गारवा निर्माण करणाऱ्या खाद्यपदार्थांकडे ग्राहकांचा ओढा होता. दूषित पाण्यापासून बनवलेल्या बर्फाचे पदार्थ खाल्ल्याने काविळीला सुरुवात झाली असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

हसूर यात्रेतील बर्फाचे गोळे, भेळ, पाणीपुरी खाल्याने नागरिकांना काविळीची लागण झाली आहे. आरोग्य पथकाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. पाणी उकळून प्यावे. लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय पथकांशी संपर्क साधावा.
- डॉ.पांडुरंग खटावकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com