शेट्टी यांचा आंदोलनाचा इशारा

शेट्टी यांचा आंदोलनाचा इशारा

पोलिस बळाचा वापर केल्यास
जशास तसे उत्तर ः राजू शेट्टी

जयसिंगपूर, ता. १० : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या जिल्ह्यातील चोकाक ते उदगांव-अंकली या महामार्गाच्या मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. जुन्या बायपास महामार्गावरून महामार्ग व चौपट भरपाई अशी शेतकऱ्यांची मागणी असताना वारंवार प्राधिकरण मोजणीसाठी येत आहे. सोमवारी उदगाव येथे मोजणीसाठी येताना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची कुमक बोलावून घेतली होती. त्यामुळे पोलिस बळाचा वापर केला तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टी म्हणाले, ‘जमिनी मोजण्यासाठी येण्यापूर्वी शेतकऱ्यांना आठ दिवस अगोदर नोटिसा देणे आवश्यक असते. मात्र, उदगावच्या शेतकऱ्यांना शनिवारी व रविवारी नोटिसा देऊन सोमवारी मोजणीसाठी पथक येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा तीव्रपणे विरोध असून, उदगाव येथील सध्या असलेल्या बायपास महामार्गावरूनच होणारा महामार्ग व्हावा. बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चौपट दर मिळावा. असे असताना याकडे प्राधिकरण विभागाने किंवा शासनाने दुर्लक्ष केले आहे.
भूमिअभिलेख विभागाकडून कोणतीही अद्ययावत कागदपत्रे न तपासता तसेच संबंधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता जुन्या कागदपत्राद्वारे मोजणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चित नसून, वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com