जयसिंगपुरातील एलईडी पोल कामाची चौकशी करा

जयसिंगपुरातील एलईडी पोल कामाची चौकशी करा

Published on

एलईडी पोल कामाची चौकशी करा
शैलेश आडके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता.२ : स्मार्ट सिटीच्या नावाखाली जयसिंगपूर नगरपालिकेकडून एलईडी पोलमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार दडला असून, तातडीने या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे. या कामासाठी पालिकेने कंपनीला ८१ लाख रुपये अतिरिक्त निधी दिल्याचाही आरोप श्री. आडके यांनी केला आहे.
ते म्हणाले, ‘स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहराला एलईडी पोल लावण्यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून शहरात ४०५ एलईडी पोल बसवण्याचे काम सुरू आहे. डीएसआर दराच्या नावाखाली ४९,९०० रुपयाला एक पोल खरेदी करून बसवले आहेत. यामध्ये एलईडी बल्बचा समावेश नाही. मात्र, दुसऱ्या कंपनीकडून हे पोल केवळ ३०,५०० रुपयाला याच पद्धतीचा मिळत असतानाही नगरपालिकेने सुमारे प्रति पोल २० हजार रुपये अतिरिक्त दिले आहेत. एका पोलचे वीज बिल २० रुपये दररोज येणार असून, सुमारे २, ४३,००० रुपये महिन्याला वीज बिल या पोलचे येणार आहे. नगरपालिकेने सुमारे ८१ लाख रुपये या पोलमध्ये अतिरिक्त निधी संबंधित कंपनीला दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कामाचीदेखील तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीदेखील शैलेश आडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात मुख्याधिकारी तथा प्रशासक टिना गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.