बारा हजार मृत मतदारांना यादीतून वगळले

बारा हजार मृत मतदारांना यादीतून वगळले
Published on

बारा हजार मृत मतदारांना यादीतून वगळले
शिरोळ तालुका; अठरा वर्षांवरील नवमतदारांची नोंदणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २ : लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघात बारा हजारांवर मृत मतदारांची नावे वगळली आहेत. जिवंत व्यक्तीचे नाव मृत यादीमध्ये असल्यास खातरजमा करण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे. याची नोंद बीएलओकडे द्यावी तसेच वृद्धापकाळाने अंथरुणावर असलेल्या रुग्ण मतदारांचे मतदान घरी जाऊन घ्यावे, चाळीस टक्के अधिकृत दिव्यांगांची यादी तयार करावी, मतदार यादीत पुसट फोटो असल्यास रंगीत फोटो बीएलओ यांच्याकडे द्यावा, अशी माहिती तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी दिली.
शिरोळ येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार हेळकर बोलत होते. ते म्हणाले, ‘कार्यालयाकडे केवळ १५ तक्रारी आल्या होत्या. त्यांचा पुन्हा सहा नंबरचा फॉर्म भरून पुढील निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला आहे. त्याच धर्तीवर यादी गाववार बीएलओतर्फे दिली आहे. त्याची पडताळणी करून जिवंत व्यक्तीचे नाव मृत यादीमध्ये असल्यास सहा नंबरचा फॉर्म भरून बीएलओकडे द्यावा.’
....

दृष्टिक्षेपात तयारी
* मतदार यादीवरील दावे व हरकती स्वीकारणे- २५ जुलै ते १ ऑगस्ट
* विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम-मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून मान्यता घेणे
* कंट्रोल चार्ट अद्ययावतीकरण, नमुना १ ते ८ तयार करणे-१ जुलै २०२४ च्या अर्हता निश्चित करण्यावर दावे व हरकती निकाली काढणे, आयोगाची परवानगी मिळवणे.
* डेटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी यादी तयार करणे-१९ ऑगस्टपर्यंत
* अंतिम मतदार यादी प्रसिद्धी-२० ऑगस्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com