शिवप्रकल्पाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

शिवप्रकल्पाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

Published on

08355
जयसिंगपूर : अश्‍वारूढ पुतळा प्रकल्पाची पाहणी करताना संजय पाटील-यड्रावकर यांच्यासह पदाधिकारी.
----------------
शिवप्रकल्पाचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा
संजय पाटील-यड्रावकर; जयसिंगपूरमध्ये कामाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३ : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून सहा कोटी ८८ लाख रुपयांतून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा व संग्रहालयाचे काम सुरू आहे. याला किल्ल्याचे स्वरूप देण्यासाठी दगडी टचअपचे काम सुरू आहे. ते आकर्षक व सुबक पध्दतीने झाले पाहिजे. येत्या १५ दिवसांत तयार झालेला पुतळा जयसिंगपूर येथे आणण्यात येणार आहे. त्यामुळे सुरू असलेले काम तातडीने १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी ठेकदारांना दिली.
जयसिंगपूर येथे उभारण्यात येत असलेली नगरपालिका इमारत, स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा प्रकल्प, आदी कामांची पाहणी प्रशासक तथा मुख्याधिकारी टिना गवळी, माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे केली. यावेळी माजी नगराध्यक्ष यड्रावकर यांनी ठेकेदारांना सूचना केल्या.
प्रथम नगरपालिकेच्या इमारतस्थळी भेट दिली. १५ ऑगस्टपर्यंत तीन मजल्यांपर्यंतचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे. उरलेल्या दोन मजल्यांचे कामही त्या पाठोपाठ करावे. त्यामुळे नगरपालिकेचे कामकाज नव्या इमारतीत करण्यासाठी सुबक होईल, अशाही सूचना ठेकेदार यांना मुख्याधिकारी यांनी दिल्या. त्यानंतर येथील दसरा चौकात सुरू असलेले भव्य स्टेडियमच्‍या कामाची पाहणी केली. येथील ठेकेदारांनाही विविध सूचना केल्या. त्यानंतर येथील अश्‍वारूढ पुतळा प्रकल्पाची पाहणी केली. पुतळ्याचा मुख्य चबुतरा पूर्ण झाला आहे. त्यावरील तयार केलेल्या भागाचे दगडी टचअपचे काम शिल्लक आहे. सध्या संरक्षक भिंतीलाही दगडी टचअप करण्यात येत आहे. त्यामुळे शिल्लक असलेले सर्व काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना ठेकेदारांना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक संभाजी मोरे, राहुल बंडगर, बबन यादव, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.