डॉक्टर, अधिकाऱ्यांचा जयसिंगपूरला व्हॉट्सअॅप ग्रुप

डॉक्टर, अधिकाऱ्यांचा जयसिंगपूरला व्हॉट्सअॅप ग्रुप

डॉक्टर, अधिकाऱ्यांचा
जयसिंगपूरला व्हॉट्सअॅप ग्रुप

जयसिंगपूर, ता. ८ : शहरातील डेंगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील डॉक्टर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा संयुक्त व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील डॉक्टर डेंगी रुग्णांची माहिती देणार आहेत. यानंतर पालिका प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रुग्ण राहत असलेल्या परिसरात सर्वेक्षण आणि उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
शहरात ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी आणि तुंबलेल्या गटारीमधून डासांच्या फौजा तयार होत आहेत. पालिकेकडून साधी औषध फवारणीही केली नसल्याने दिवसेंदिवस डासांच्या उत्पतीत वाढ होत होती. पालिकेच्या आरोग्य विभागाला डेंगीचे गांभीर्य नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच अतिरिक्त जबाबदारी म्हणून शहरातील डॉक्टरांशी समन्वय ठेवून रुग्णांची माहिती घेऊन त्या भागात सर्वेक्षण करत उपाय योजना राबवण्याची मागणी होऊ लागली होती. जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या पुढाकारातून शहरातील डॉक्टर, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा संयुक्त व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील डेंगीवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com