

कोथळीत दोघांवर
विळ्याचे वार
जयसिंगपूर, ता. २६ : रोपवाटिकेला घातलेले कुलूप काढण्यावरुन कोथळी (ता.शिरोळ) येथे राजू निजाम निवडे व इकबाल निजाम निवडे (दोघे रा.निवडे मळा, कोथळी) या दोघांवर विळ्याने मारुन गंभीर जखमी केले. तसेच काठीने हातावर व पायावर मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी नसीफा इकबाल निवडे, अरबाज इकबाल निवडे (दोघे रा.कोथळी) यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामायिक शेत जमिनीवरुन जखमी राजू निवडे व संशयित आरोपी नसीफा निवडे यांच्यामध्ये वाद आहे. मंगळवारी जखमी राजू निवडे व इकबाल निवडे यांनी रोपवाटिकेला घातलेले कुलूप काढा, रोपांना पाणी द्यायचे आहे असे नसीफा निवडे यांना सांगितले. यावेळी नसीफा निवडे यांनी मी कुलूप काढणार नाही तुला काय करायचे ते कर अशी धमकी देऊन शिवीगाळ केली व अरबाज निवडे यांनी बाजूला पडलेली काठी घेऊन इकबाल निवडे यांच्या हाता पायावर काठीने मारहाण केली. राजू निवडे यांच्या हातावर विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. याबाबतची फिर्याद जखमी राजू निवडे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.