खराब हवामानाने गावठी आंब्याला फटका

खराब हवामानाने गावठी आंब्याला फटका
Published on

13706
जयसिंगपूर ः खराब हवामानामुळे गावठी आंब्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे.

हवामानाचा आंब्याला फटका
मोहोर करपला, फळगळती वाढली; उत्पादन घटण्याची भीती

गणेश शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३ : बदलत्या हवामानाचा फटका गावठी आंब्याला बसत आहे. सुरुवातीला मोहोर करपला, तर सध्या फळगळतीचे प्रमाण वाढल्याने आंबा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

मोहोर करपला
सध्या बाजारात हापूस आंब्याचे दर डझनला हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत शहरी व ग्रामीण भागात ‘घरचा आंबा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावठी आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा होती. मात्र, मोहोरातच खराब हवामानामुळे मोठ्या प्रमाणात मोहोर करपला. सध्या लहान आकारातील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फळगळती वाढली
यावर्षी आंब्याला चांगल्या प्रमाणात मोहोर आला होता; मात्र त्यात नर मोहोराचे प्रमाण जास्त असल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्यानंतर पडलेल्या दाव्यामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे मोहोर काळवंडला. थंडी आणि बदलत्या हवामानामुळेही फळगळती वाढली. कोकणासह शिरोळ तालुक्यातील गावठी आंब्यालाही यंदा हवामानाचा फटका बसला आहे.

आवक कमी; दर गगनाला
सध्या गावठी आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला नाही. मात्र, कोकणातील विविध जातींचा आंबा सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी बाजारात दाखल झाला आहे. आवक मर्यादित असल्याने दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
------------
युद्धाचा परिणाम दरावर नाही
आखाती देशांतील युद्धामुळे कोकणातील आंब्याची निर्यात काहीशी मंदावली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात आंब्याची उपलब्धता वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, उत्पादन कमी असल्याने चांगल्या दर्जाचा आंबा बाजारात अद्याप पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्या आंब्याचे दर अधिकच वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com