संक्षिप्त ३

संक्षिप्त ३
Published on

जयसिंगपूरला पेट्रोल पुरवठा सुरळीत
जयसिंगपूर : शहरात पेट्रोल, डिझेलचा पुरवठा सुरळीत झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेलची टंचाई झाल्याच्या अफवेतून आठवडाभर शहरातील पेट्रोल पंप वाहनदाराच्या गर्दीने फुल्ल होते. अचानक वाढलेल्या मागणीमुळे पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण झाली होती. सकाळी सहापासूनच वाहनांच्या रांगा पंपावर होत्या. चार दिवसांपासून सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने वाहनधारकांची गर्दी ओसरली आहे.

शिरोळ तालुक्यात गॅस टंचाई
जयसिंगपूर : आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यात अद्यापही गॅस टंचाईचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे. यातच ऑनलाइन बुकिंग करून सिलिंडरची प्रतीक्षा असतानाच सिलिंडर घेतले नसतानाही ‘डिलिव्हरी’चे मेसेज ग्राहकांच्या मोबाईलवर येत असल्याने गॅस ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सिलिंडर मिळण्यासाठी आठ-दहा दिवसांचा कालावधी असताना असे मेसेज मोबाईलवर येत असल्याने ग्राहक, गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

चाऱ्याअभावी पशूपालकांची गैरसोय
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. ऊस हंगाम संपल्यानंतर टंचाई सुरू झाली. अद्याप उसाची वाढ नसल्याने आणखी दोन महिने पशुपालकांची गैरसोय होणार आहे. गवत, चाऱ्यासाठी विक्री होणाऱ्या उसाची काही प्रमाणात उपलब्धता असली तरी दर वाढल्याने पशुपालकांना शेताच्या बांधावरील गवत आणि सुका जनावरांना द्यावा लागत आहे. अद्याप जोरदार वळीव पाऊस झाला असल्याने शेताच्या बांधांवर चारा उगवला नाही. सध्या पशुपालकांचे चाऱ्याभवे मोठे हाल सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com