''कर्मवीर मल्टिस्टेट''कडे ८०४ कोटींच्या ठेवी

''कर्मवीर मल्टिस्टेट''कडे ८०४ कोटींच्या ठेवी
Published on

''कर्मवीर मल्टिस्टेट''कडे
८०४ कोटींच्या ठेवी : पाटील
जयसिंगपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीने ८०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करून मार्च २०२६ अखेर ८०४ कोटींच्या ठेवी जमा केल्या.
कर्ज वितरणातील शुद्धता, वसुलीचे अचूक नियोजन यामुळे शून्य टक्के एनपीएची परंपरा कायम राखली. २०२५-२६ वर्षात प्रत्यक्ष वसूल झालेले व्याज उत्पन्नात घेऊन ११ कोटी ७० लाख नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष रमेश पाटील यांनी दिली. संस्थेकडे १०१ कोटी स्वनिधी आहे. संस्थेने १८ टक्के व्यवसाय वाढ नोंदवत १३३२ कोटींचा व्यवसाय केला. संस्थेकडे ७८९३९ सभासद असून अत्यल्प व्याज दरात व सुलभ पद्धतीने कर्ज वाटप केले आहे. ५२८ कोटींचे कर्जे झाली आहेत. उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक सागर चौगुले, अरविंद मजलेकर, आदिनाथ किणिंगे, भूपाल गिरमल, सीईओ चंद्रकांत धुळासावंत, प्रकाश उपाध्ये, विजय बुकशेटे आदींचे योगदान लाभले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com