पाणीपट्टी कमी करण्याचा कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपट्टी कमी करण्याचा कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीचा निर्णय
पाणीपट्टी कमी करण्याचा कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीचा निर्णय

पाणीपट्टी कमी करण्याचा कळे-खेरीवडे ग्रामपंचायतीचा निर्णय

sakal_logo
By

पाणीपट्टी कमी करण्याचा
कळे-खेरिवडेमध्ये निर्णय
कळे, ता. ५ : पाणीपट्टी दर कमी करण्याचा निर्णय कळे-खेरिवडे ग्रामपंचायतीने घेतला. अनियमित पाणीपुरवठा, बोगस कनेक्शन व भरमसाठ पाणीपट्टीमुळे ग्रामस्थ हैराण होते. त्याया पार्श्‍वभूमीवर देव, देश, धर्म रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी माहे ऑगस्टच्या ग्रामसभेत अर्ज देऊन विषय मांडला होता.
सांडपाणी नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीने पाणी मीटर बसवली. पाणीपट्टी प्रतियुनिट सात रुपये दर आहे. पुरेसा पाणीपुरवठा होऊन पाणीबिल कमी येईल, अशी ग्रामस्थांची धारणा होती. मात्र दोन दिवसांतून एकदा अनियमित व एकच तास पाणीपुरवठा होत होता.
मीटर जोडण्यापूर्वी नऊशे रुपये वार्षिक पाणीपट्टी येत होती. मीटर जोडल्यानंतर दोन हजार ते तीन हजार रुपये पाणीपट्टी येत असल्याचा आरोप होत होता. बोगस कनेक्शनधारकांवर ग्रामपंचायत कारवाई करत नसल्याने नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे सर्वांना परवडेल असा वार्षिक एकच दर ठरवावा व पाणीमीटर काढावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा संघटनेने दिला होता.
-------------
चौकट
पन्नास युनिटपर्यंत तीनशे रुपये
वार्षिक पाणीपट्टी नऊशे रुपये होती. पाणीमीटर बसविण्याल्यानंतर पाणीपट्टी प्रतियुनिट सात रुपये केला होता. आता पहिल्या पन्नास युनिटपर्यंत तीनशे रुपये स्थिर आकार लावण्याचे ठरले असून पन्नास युनिटपर्यन्तच पाणी वापरणाऱ्यांना वर्षाला नऊशे रुपये पाणीपट्टी येईल. पन्नास युनिटच्या पुढे पाण्यासाठी प्रतियुनिटसाठी सहा रुपये दर लागू करण्याचे ग्रामपंचायतीने ठरवले आहे.