कळे: मरळी येथील एकजण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: मरळी येथील एकजण जखमी
कळे: मरळी येथील एकजण जखमी

कळे: मरळी येथील एकजण जखमी

sakal_logo
By

दुचाकीवरून सायकल नेताना
बसलेल्या धडकेत एकजण जखमी

कळे : दुचाकीवरून सायकलची वाहतूक करताना बसलेल्या धडकेत मरळी (ता. पन्हाळा) येथील एकजण जखमी झाला. प्रदीप पांडुरंग पाटील (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. याबाबत कळे पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल झाली. प्रदीप आपल्या दुचाकी (एम. एच. ०९-३२०१) वरून त्यांची मुलगी प्रांजल हिला घेऊन कळे येथे कामानिमित्त निघाले होते. दरम्यान, एक अनोळखी दुचाकीस्वार आपल्या मोटारसायकल (एम.एच.४३ टी. ३९३) च्या सीटवर सायकल आडवी घेऊन निघाला होता. कळे कॅटिंग परिसरात आले असता पास करून जाण्याच्या प्रयत्नात प्रदीप यांना सायकलचा धक्का लागला. त्यामुळे प्रदीप रस्त्यावर पडून जखमी झाले. दरम्यान, त्यांनी धडक दिलेल्या दुचाकीचा क्रमांक नोंद केला. त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुशांत धनवडे करत आहेत.