कळे-तळेवाडी -कुंभारवाडी रस्त्यासाठी
सात कोटी २५ लाखाचा निधी मंजूर

कळे-तळेवाडी -कुंभारवाडी रस्त्यासाठी सात कोटी २५ लाखाचा निधी मंजूर

03603
कळे-तळेवाडी-कुंभारवाडी रस्त्यासाठी
सात कोटी २५ लाखांचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
कळे, ता. ११ : कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग ते पुनाळ फाटा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यासाठीचा सुधारित रस्त्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून होता. दरम्यान, कळे-तळेवाडी-कुंभारवाडी रस्त्यासाठी अर्थसंकल्पात सात कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले.
नेहमीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या या रस्त्याचे काम कधी होणार, अशी विचारणा परिसरातील नागरिक, व्यापारी, वाहनधारकांतून होत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असंतोष पसरला होता. अनेक संघटना तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. याबाबत ‘कळे-कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग ते पुनाळ फाटा रस्ता समस्यांच्या गर्तेत’ या मथळ्याची बातमी दैनिक ‘सकाळ’मधून १ जुलैला प्रसिद्ध झाली होती. आमदार चंद्रदीप नरके यांनी याची दखल घेऊन या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करून अर्थसंकल्पात निधी मंजूर करून घेतला.
याबाबत माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘मंजूर झालेला निधी लवकरात लवकर उपलब्ध करून जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असणाऱ्या या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com