सावर्डेत रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

सावर्डेत रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Published on

रक्तदान शिबिरास
सावर्डेत प्रतिसाद
कळे : सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथील श्री सत्यसाई सेवा समिती, सावर्डे यांच्या वतीने श्री सत्यसाई सेवा संघटना व वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सावर्डे परिसरातील ५० दात्यांनी रक्तदान केले. सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे संघटनेच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिरास नवयुवकांचा सहभाग होता. शिबिरासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बजरंग माळी, रक्तदान शिबिरप्रमुख प्रसाद धारवाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सावर्डे गावचे समिती प्रमुख रोहित भोसले, संजय पाटील, रोहित काळे, स्वरूप पाटील आदींसह साईभक्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com